Back

उज्ज्वला चंद्रभागा श्रीरंग टिंगरे

पद: सहायक राज्यकर आयुक्त, 2022 राज्यसेवा

दुष्काळग्रस्त आटपाडीतील झरे गावात उज्ज्वलाचे कुटुंब राहते. पाच बहिणी आणि एक भाऊ .

आईवडील मजुरी करून एवढ्या मुलांचा सांभाळ करत होते. खडतर परिस्थितीत सुद्धा मुलांना शिकवत होते. उज्ज्वलाचे प्राथमिक शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शिक्षण पं. जवाहरलाल नेहरु वि‌द्यालय, झरे आटपाडी जि. सांगली येथे झालं.

उज्ज्वलास लहानपणापासूनच घरच्या बिकट परिस्थितीची जणीव होती.म्हणूनच श्रीमती. कस्तुरबाई वालचंद महाविद‌यालय,सांगली येथे 11 वी 12 वी मध्ये  शिक्षण घेत असताना आईवडिलांचा आर्थिक भार हलका करण्यासाठी  तिने कापड़ दुकानात काम केले. पदवीचे शिक्षण घेत असताना एका शाळेत  अर्धवेळ शिक्षकाची नोकरी सुद्‌धा केली.शिवाय ‘पाणी माती परिक्षण प्रयोगशाळेत’सुद्धा काम केले.

‘शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे सुद्‌धा ‘कमवा आणि शिका’ योजनेतून Biochemistry या विषयात M.Sc पूर्ण केले.

अभ्यासातील प्रगती व कष्ट करण्याची तयारी असल्याने  स्पर्धा परीक्षेसारख्या क्षेत्रात येऊन आईवडिलांची मजुरी ,त्यांचे कष्ट कायमचे बंद करण्याचा निर्धार उज्ज्वलाने केला.

 जून 2018 मध्ये स्पर्धा परीक्षेसाठी ती पुण्यामध्ये आली . परंतु याठिकाणी राहण्यासाठी शाश्वत आर्थिक स्रोत नसल्याने सुरुवातीचे एक वर्ष part time jobकेला. Aug 2019 मध्ये मात्र job सोडून स्पर्धा परीक्षांचा पूर्णवेळ अभ्यास सुरु केला.

अभ्यासाच्या सुरुवातीच्या काळातच कोरोनाचे भयंकर संकट समोर उभे ठाकले. Covid 19 च्या काळात

3 महिने घरी राहून अभ्यास केला, त्यानंतर परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने पुण्यामध्ये अभ्यासासाठी परत आली. मात्र परीक्षा बऱ्याच वेळा पुढे जात होती, अश्या वेळी video lecture, telegram voice chat किंवा pyq solving ह्या माध्यमातून अभ्यासातील सातत्य टिकवून ठेवले.घरच्यांचाच नाही तर जगाचा  संपर्क तुटलेल्या भीतीदायक परिस्थितीत उज्ज्वला अखंडपणे अभ्यास करत होती.

MPSC२०२० ची राज्यसेवा पूर्व झाली.या परीक्षेत केवळ 4 गुणांनी ती अपात्र ठरली. त्यावेळी प्रचंड नैराश्य आले. अश्यावेळी मोठ्या बहिणीने  मानसिक आधार दिला आणि उज्ज्वलावर  विश्वास दाखवत परत एकदा लढण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर उज्ज्वला प्रत्येक पूर्व परीक्षेत खूप चांगल्या मार्काने पास झाली. राज्यसेवा 2021 मध्ये  मुलाखतीपर्यंत पोहोचली आणि 2022 राज्यसेवा मधून पूर्व, मुख्य,अंतिम मुलाखत हे सगळे टप्पे यशस्वीरीत्या पार करून तिने सहायक  राज्यकर आयुक्त वर्ग 1 हे पद मिळवले.

Covid नंतर घरून येताना उज्ज्वलाने मनाशी निर्धार केला होता की,’’ पास होऊनच घरी परत येईन” आणि त्यानुसार तब्बल अडीच वर्षांनी अधिकारी होऊन गावात पाऊल ठेवले.पहिली क्लास 1 अधिकारी म्हणून उज्ज्वलाने कुटुंबासह गावाचेही नाव उज्ज्वल केले.

स्पार्क अकॅडमी, पुणे